मोदींच्या कार्यक्रमाबद्दल शिवसेना मंत्र्यांची नाराजी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 डिसेंबर 2016

मुंबई - शिवस्मारक तसेच मेट्रोचा उद्‌घाटन कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा (भाजप) होता काय, असा प्रश्‍न विचारण्यास शिवसेनेने प्रारंभ केला आहे.

मुंबई - शिवस्मारक तसेच मेट्रोचा उद्‌घाटन कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा (भाजप) होता काय, असा प्रश्‍न विचारण्यास शिवसेनेने प्रारंभ केला आहे.

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधी शिवसेनच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी प्रश्‍न उपस्थित केला असल्याचे समजते. हा कार्यक्रम भाजपने स्वत:च्याच पक्षाभोवती केंद्रित ठेवला होता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या घोषणा देण्याचे कारण काय, असा प्रश्‍नही मंत्र्यांनी विचारल्याचे समजते. भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांशी यासंदर्भात संपर्क साधला असता प्रारंभी कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. पुन्हा विचारणा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय घडले ते बाहेर सांगणे उचित नाही, असे सांगण्यात आले.

शिवस्मारकाच्या उद्‌घाटनानंतर बांद्रा कुर्ला संकुलात झालेल्या सभेत "शिवसेनेचा वाघ आला' या घोषणेला भाजपने "मोदी मोदी' करत प्रत्युत्तर दिल्याने काहीसा तणाव निर्माण झाला होता. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दोन्ही बाजूंना शांत केल्याने संभाव्य तणाव निवळला. मोदी यांचे नाव मोठे करत भाजपची मंडळी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीचे समजतात काय, असा प्रश्‍न शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते आज खासगीतही याच भावनांना वाट करून देत होते.

Web Title: Shivsena leaders displeasure for Modi's programme