भाईंदरमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार; भाजप-शिवसेनेतील नेत्यांची घरवापसी

संदीप पंडित
Wednesday, 20 January 2021

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने आतापासूनच तयारी सुरू केले आहे

भाईंदर ः मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या माजी महापौर निर्मला सावळे व माजी विरोधी पक्षनेते डॉ. आसिफ शेख यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश केला. सावळे व शेख यांच्यासोबत जयंत पाटील, भाजपाचे उत्तन मंडळ अल्पसंख्याक अध्यक्ष अस्लम कुरेशी, तारीख शेख, शिवसेनेचे ग्राहक संरक्षण विभागाचे अध्यक्ष दुर्गेश शेळके, रमजान खत्री, विजय ठोकले-पाटील, विनोद शेवंते आदी शेकडो कार्यकर्त्यांनीदेखील राष्ट्रवादी प्रवेश केला. 

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने आतापासूनच तयारी सुरू केले आहे. वॉर्डनिहाय पक्षबांधणी करून समाजातील प्रत्येक घटकाला त्यात सामावून घेण्यात येईल व पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच होईल, त्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न करू, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते माजी विरोधी पक्षनेते डॉ. आसिफ शेख यांनी व्यक्त केला. 2017 मध्ये मिरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी माजी महापौर निर्मला सावळे यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करून निवडणूक लढविली होती; परंतु त्यांचा पराभव झाला होता; तर माजी विरोधी पक्षनेते डॉ. आसिफ शेख यांनी शेवटच्या क्षणी भाजपात प्रवेश केला होता; परंतु निवडणूक लढविली नव्हती.

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

अखेर दोघांनीही आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करून स्वगृही परतल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुलकर, युवक जिल्हाध्यक्ष साजिद पटेल उपस्थित होते.

shivsena leaders joins NCP in meera bhayandar strength will increase in city 

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena leaders joins NCP in meera bhayandar strength will increase in city