प्रताप सरनाईकांना २३ ऑगस्टपर्यंत ईडीच्या कारवाईपासून दिलासा

दोन्ही प्रकरणाची सुनावणी एकत्र घेण्याची याचिकाकर्त्यांची मागणी हायकोर्टाने मान्य केली आहे.
Pratap Sarnaik
Pratap SarnaikSakal

मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shivsena mla pratap sarnaik) आणि त्यांच्या कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. एनएसईएल (NSEL) आणि टॉप्स सिक्युरिटीज (TOPS Security) प्रकरणात ईडीच्या कारवाईविरोधात प्रताप सरनाईक यांच्यासह विहंग आणि पूर्वेश या त्यांच्या दोन्ही मुलांनी हायकोर्टात (high court) याचिका दाखल केली होती. प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात 23 ऑगस्टपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे हायकोर्टाने निर्देश कायम ठेवले आहेत. दोन्ही प्रकरणाची सुनावणी एकत्र घेण्याची याचिकाकर्त्यांची मागणी हायकोर्टाने मान्य केली आहे. (Shivsena mla pratap sarnaik got relief from ed action until 23 august dmp82)

मनी लॅाड्रिंग प्रकरणामुळे ईडीच्या रडारवर (Enforcement Directorate) असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून ६ जुलैला (Mumbai High Court) 28 जुलै पर्यंत दिलासा मिळाला होता. सरनाईक आणि त्यांची मुले विहंग आणि पूर्वेश यांच्यासह निकटवर्तीय योगेश चंडेला यांनी उच्च न्यायालयात याचिका (Petetion in High Court) केली आहे. अमंलबजावणी संचालनालयाने टिटवाळा जमीन गैरव्यवहार (Titwala land scam)आणि एनएसईएल यामध्ये चौकशी करण्यासाठी समन्स बजावले होते. टिटवाळा जमीन गैरव्यवहार प्रकरणात जमीनींच्या खरेदी विक्री बाबत आरोप करण्यात आले आहेत.

Pratap Sarnaik
पाच महिन्यात पॉर्न अ‍ॅपमधून राज कुंद्राने कमावले इतके कोटी

सरनाईक यांच्या विहंग गृहनिर्माण कंपनीने एक गृहनिर्माण प्रकल्प सुरू केला होता. यासाठी टिटवाळामध्ये काही जमिनी खरेदी केल्या होत्या. मात्र, सुमारे बावीस कोटी रुपयांच्या या व्यवहारात फसवणूक केली असा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये देशमुख आणि सरनाईक यांच्या खात्यात पैसे वळविले असा आरोप केला जात आहे. ईडीने सन 2014 मध्ये भूखंड ताब्यात घेऊन सर्व व्यवहार थांबविले आहेत. मात्र आता हा भूखंड पुन्हा विक्रीला काढल्याचे उघड झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com