शिवसेनेच्या आमदारांना मातोश्रीवरून आला 'हा' आदेश..

शिवसेनेच्या आमदारांना मातोश्रीवरून आला 'हा' आदेश..

महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या पेचामुळे आणि संभाव्य घोडेबाजार त्याचसोबत सर्व आमदारांसोबत एका छताखाली संवाढ साधता यावा यासाठी शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना सुरवातीला मुंबईतील रंगशारदामध्ये राहण्यास सांगितलं होतं. या नंतर या सर्व आमदारांची मुंबईतील मालाड भागातील हॉटेल रिट्रिट इथं शिफ्ट करण्यात आलं होतं. आज तब्बल सहा दिवसांनी आता शिवसेना आमदारांना घराकडे जाण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळे आता शिवसेनेचे सर्व आमदार  आपापल्या मतदार संघात जाऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर येत्या काळात काम करताना पाहायला मिळू शकतात. 

कर्नाटकच्या धर्तीवर शेवटच्या क्षणी भाजपकडून आमदारांच्या फोडाफोडीला सुरुवात होईल, अशी भीती शिवसेनेला वाटत होती. त्यामुळे त्यांनी गुरुवारी सर्व आमदारांना रंगशारदा येथे मुक्कामी ठेवले होते.

शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यपालांनी काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविल्याने, शिवसेनेने आणखी खबरदारी घ्यायचे ठरवले आहे. त्यात रंगशारदामध्ये पुरेशा खोल्या नसल्याने शिवसेनेच्या आमदारांना मालाड येथील रिट्रीट हॉटेलमध्य शिफ्ट केलेलं शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर तसेच आमदार अनिल परब यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. 

Webtitle : shivsena MLAs are asked to go home after six days

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com