ग्रामीण भागातील स्वच्छतेसाठी शिवसेना आमदारांचा हातभार

संजीत वायंगणकर
मंगळवार, 24 एप्रिल 2018

डोंबिवली पालिकेच्या घन कचरा विभागाला घंटागाडी देण्याच्या या कार्यक्रमाचे आयोजन प्रभाग क्रमांक 112 नांदिवली पाडा येथे नगरसेविका रुपाली रवी म्हात्रे यांच्या कार्यालयाजवळ करण्यात आले होते.

डोंबिवली - गावे पालिकेत समाविष्ट झाल्यापासून येथील घनकचरा व्यवस्थापन व आरोग्याच्या अनेक समस्या हा चर्चेचा विषय झाला आहे. कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार सुभाष भोईर यांनी आपल्या      आमदार निधीतून एक घंटागाडी ग्रामीणच्या 12 प्रभागांसाठी दिली. त्या गाडीचे लोकार्पण आमदारांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवूनवा सुभाष भोईर यांच्या हस्ते फित कापून  सोमवारी सायंकाळी करण्यात आले. 

याप्रसंगी आ. सुभाष भोईर म्हणाले कि, या प्रभागातील नागरिक सुज्ञ आहे. 
ओला व सुका कचरा विलगीकरण प्रक्रिया सुलभ रितीने होण्यासाठी या घंटागाडीची मदत होइल. त्यामुळे या गाडीचा योग्यप्रकारे उपयोग प्रभागातील नागरिक करतील.अश्या प्रकारचा पहिला प्रयोग शिळफाटा येथे आम्ही केला होता. अश्या प्रकारच्या सुविधा तेथे दिल्याने तेथील परिसर स्वच्छ राहिला. पालिकेच्या इतर प्रभागात मागणीनुसार घंटागाडी देण्यात येइल. रवी म्हात्रे, पंढरी पाटील, प्रकाश म्हात्रे, प्रमिला म्हात्रे, प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे, विलास जोशी आदी मान्यवर व शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Shivsena MLAs help in cleaning the rural areas