शिवसेनेचे आमदार रिलॅक्स मूडमध्ये; मढ बीचवर एकत्र

Shivsena
Shivsena

मुंबई : भाजप आणि शिवसेना यांच्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसताना शिवसेना आमदार बीचवर रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहे. शिवसेनेने आपल्या आमदारांना एकाच ठिकाणी ठेवले असून, त्यांना आमदार फुटण्याची भीती असल्यानेच सर्वांना एकत्र ठेवले आहे.  

शिवेसना आमदार आज (शनिवार) रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहेत. कारण सेनेचे आमदार मढ बीचवर फिरायला गेले होते. आमदार प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील, यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी मढ बीचवर आनंद घेतला. शिवाय कार्यकर्त्यांसोबत सेल्फीही काढून आमदार फोटोसेशन करत आहेत.

सत्तासंघर्ष सुरु असताना शिवसेनेचे सर्व आमदार एक गठ्ठा फिरत आहेत. गुरुवारी हॉटेलवर जमलेले शिवसेना आमदार काल रंगशारदा सभागृहात दाखल झाले. तिथे उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनानंतर शिवसेना आमदारांना मालाडमधील हॉटेलवर हलवण्यात आले. त्यानंतर आज ते मढ बीचवर दिसले. 

उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप केला. कारण लोकसभा निवडणुकीपूर्वी युती झाली त्यावेळी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याच समोर मुख्यमंत्रिपदाच्या अटी ठरल्या होत्या. तसेच भाजपने ठाकरेंवर खोटारडेपणाचा आरोप करण्यापेक्षा स्वत:चा इतिहास तपासावा. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत वाद सुरु असून, अद्याप कोण सत्ता स्थापन करणार हे निश्चित नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com