COVID19 - शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांच्या पगाराबाबत संजय राऊतांनी दिली मोठी माहिती

COVID19 - शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांच्या पगाराबाबत संजय राऊतांनी दिली मोठी माहिती

मुंबई: कोरोनाचं संकट भारतात दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. भारतात कोरोग्रस्तांचा आकडलं तब्बल ७०० च्या वर पोहोचला आहे तर २० जणांना आपले प्राण कोरोनामुळे गमवावे लागले आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप आहे.  त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेकांचे मदतीचे हात पुढे सरसावले आहेत.

महाराष्ट्रात आतापर्यंत १३० पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे  तर चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यापुढे अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकार अनेक प्रयत्न करत आहे. राज्य सरकारकडून २३ मार्चपासून लॉकडाऊन करण्याचे आदेश देण्यातआले आहेत. मात्र या मंदीच्या काळात सरकारपुढे आर्थिक समस्या येत आहेत. म्हणूच आता शिवसेनेच्या सर्व आमदार आणि खासदारांनी आपला एक महिन्याचा पगार राज्य सरकारला देण्याचं निश्चित केलं आहे. 

या पार्श्वभूमीवर सरकारच्या मदतीसाठी अनेक हात पुढं येत आहेत. त्यामुले राजकीय नेतेही यात मागे नाहीयेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच आपला एक महिन्याचा पगार पंतप्रधान मदत निधीमध्ये जमा केला आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही आपल्या खासदार निधीतून १ कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. तसंच काँग्रेसचे नेते राहुल गांधी २.६६ कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे. महाराष्ट्राच्या राजभवनातल्या सर्व कर्मचारी आणि अधिकारीही करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. त्यांनी आपला एका दिवसाचा पगार करोना मदत निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. आता शिवसेनेच्या आमदार, खासदारांनीही राज्य सरकारला मदत देण्याची घोषणा केली आहे.

अनेक उद्योजक कोरोगापासून सामना करण्यासाठी राज्य सरकारला मदत करणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारला अधिक सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात मदत होणार आहे.

shivsena MP and MLAs will give their one month salary to fight against corona

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com