आता संजय राऊत म्हणताहेत 'Wait and Watch!'

टीम ईसकाळ
Tuesday, 26 November 2019

महाविकासआघाडीने सर्व आमदारांसह शक्तिप्रदर्शन केले. सर्व आमदारांची ओळख परेड करण्यात आली. यात 'आम्ही 162' अशी टॅगलाईन वापरण्यात आली. याच पार्श्वभूमीवर राऊतांनी व नवाब मलिकांनी आज ट्विट केले आहे.

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दररोज ट्विट करण्याचा सपाटाच लावला आहे. काल (ता. 25) महाविकासआघाडीने सर्व आमदारांसह शक्तिप्रदर्शन केले. सर्व आमदारांची ओळख परेड करण्यात आली. यात 'आम्ही 162' अशी टॅगलाईन वापरण्यात आली. याच पार्श्वभूमीवर राऊतांनी व नवाब मलिकांनी आज ट्विट केले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

संजय राऊत यांनी आजच्या ट्विटमध्ये म्हणले आहे की, '162 and More... Just Wait And Watch!' याचाच अर्थ आमच्याकडे 162 पेक्षा जास्त आमदार आहेत... आता फक्त बघा! असा होतो. या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. 

तसेच गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटवॉर सुरू केले आहे. संजय राऊतांप्रमाणेच तेही दररोज सूचक ट्विट करत असतात. आजही त्यांनी ट्विट केले आहे. 'हमसे दीवाने भी दुनिया की खबर रखते हैं... हम जो जिन्दा हैं तो जीने का हुनर रखते हैं!' असे ट्विट नवाब मलिक यांनी केला. 

‘आम्ही १६२’

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदी शपथविधी पार पडल्यानंतर त्यांना विधानसभा अधिवेशनात सरकारचे बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. सध्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने 162 आमदारांचे संख्याबळ असल्याचे पत्र तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपालांकडे दिले आहे. त्यामुळे साहजिकच भाजपला अतिरिक्‍त कोणते आमदार मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. गेल्या एक महिन्यापासून भाजप नेत्यांनी अन्य पक्षांतील आमदार मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. तरीही, बहुमतासाठी आमदार मिळविण्याचे प्रयत्न भाजपने सोडले नसल्याचे सांगण्यात येते.  

महाविकास आघाडीच्या आमदारांना संबोधित करतानाचं शरद पवार यांचं संपूर्ण भाषण
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Sanjay Raut and NCP spokesperson Nawab Malik tweets on 26 nov