'वो झूठ बोल रहा था...' : संजय राऊत

टीम ईसकाळ
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

मुख्यमंत्रीपदावरून व जागावाटपावारून सेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच संजय राऊत रोज काही ना काही ट्विट करून चर्चेत येतच असतात. आजही त्यांनी कवी वसीम बरेलवी यांच्या कवितेतील दोन ओळी ट्विट केल्या आहेत. 

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दररोज ट्विट करायचा सपाटाच लावला आहे. दररोज सकाळी भाजपला टोला लगावणारे त्यांचे एक ट्विट पोस्ट झालेलेच असते. मुख्यमंत्रीपदावरून व जागावाटपावारून सेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच संजय राऊत रोज काही ना काही ट्विट करून चर्चेत येतच असतात. आजही त्यांनी कवी वसीम बरेलवी यांच्या कवितेतील दोन ओळी ट्विट केल्या आहेत. 

युतीचं बिनसलंय; भाजप- शिवसेना काडीमोडाच्या उंबरठ्यावर

संजय राऊत यांनी आज (ता. 9) सकाळी पुन्हा ट्विट केलंय. 'वो झूठ बोल रहा था बडे सलिके से... मै एतबार न करता तो और क्या करता' असे ट्विट राऊतांनी आज केलंय. काल काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्री फडणवीस यांनी शिवसेनेवर खोटेपणाचा आरोप केला होता. त्यावर टोला लगावत आज संजय राऊतांनी हे ट्विट केले आहे. 

या ट्विटमधून पुन्हा एकदा त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. सत्तास्थापनेसाठी कोणीच जागांचा त्याग करायला तयार नाही. शिवसेना समसमान फॉर्म्यूलावर ठाम आहे. त्यामुळे निकालानंतर 14व्या दिवशीही सत्तास्थापनेची निश्चिती झालेली नाही. 

आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी अयोध्येच्या निकालामुळे सर्वत्र आनंदी वातावऱण पसरेल, यात शिवसेनेचे मोठे योगदान आहे असे सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Sanjay Raut criticize BJP through twitter