esakal | सेनेचा वाघ भाव खातोय; 'हाता'त कमळ, तर गळ्यात 'घड्याळ'!
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena MP Sanjay Raut have shared cartoon on political situation

आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामन्यात आज एक व्यंग्यचित्र आले आहे ज्याने आणखीनच खळबळ उडाली आहे.

सेनेचा वाघ भाव खातोय; 'हाता'त कमळ, तर गळ्यात 'घड्याळ'!

sakal_logo
By
टीम ईसकाळ

मुंबई : विधानसभा निवडणूकांचे काल निकाल लागले आणि शिवसेने पारडे जड झाले. भाजपला सत्तास्थापनेसाठी शिवसेनेची गरज लागणारच, असे चित्र निर्माण झाले. अशातच काल शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आता आम्ही भाजपची अडचण समजून घेऊ शकत नाही. काहीही होऊ दे, 50-50 चा फॉर्म्यूला अवलंबावाच लागेल असा इशारा दिला आहे. यातच आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामन्यात आज एक व्यंग्यचित्र आले आहे ज्याने आणखीनच खळबळ उडाली आहे.

फॉर्म्युला ठरला? आदित्य ठाकरे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री....

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आज 'सामना'मधील हेच व्यंगचित्र ट्विटरवर शेअर करत आगामी राजकीय परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. या व्यंग्यचित्रात शिवसेनेचा वाघ आहे. त्याने हातात कमळ घेतले आहे, तर त्याच्या गळ्यात राष्ट्रवादीचे चिन्ह असलेली चेन आहे. तसेच ज्या हातात कमळ घेतलंय तो 'पंजा' ही हा वाघ स्पष्ट दाखवतोय. या चित्रातून शिवसेना आता काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या कार्टूसोबत राऊत यांनी 'व्यंग चित्रकाराची कमाल! बुरा न मानो दिवाली है..' असा संदेश लिहिला आहे. 

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि निकालानंतर महाराष्ट्रात वेगळी समिकरणे उदयाला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसून, त्यांच्या जागा कमी होऊन त्यांना 105 जागांवर समाधान मानावे लागले आहे, त्यामुळे त्यांचे स्वबळावर सत्तास्थापन करण्याचे स्वप्न भंगले आहे.

महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री 'आदित्य ठाकरे'च ?

शिवसेनेला एकूण 56 जागा मिळाल्या असल्याने भाजपला शिवसेनेला सोबत घेणे गरजेचे आहे. पण, शिवसेना ही पहिल्यापासून आदित्य ठाकरे यांच्यासाठी उपमुख्यमंत्रीपदावर अडून बसलेली आहे. त्यातच निकालापूर्वी शिवसेनेच्या या मागणीला पूर्णपणे भाजपने नकार दिला असला तरी, काल निकाल लागल्यापासून मात्र, राज्यात सत्तेची नवीन समीकरणे  उदयाला येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडे सध्या एकूण 98 जागा आहेत. तर, शिवसेनेकडे 56 जागा आहे हे तीन पक्ष मिळून 144 चा बहुमताचा आकडा पार करु शकतात अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.