कोरोनाच्या मुद्द्यावरून ट्विटरवर रंगला नरेंद्र मोदी विरुद्ध संजय राऊत सामना...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 March 2020

संजय राऊत म्हणतात;  प्रिय प्रधान मंत्री जी,...

मुंबई- महाराष्ट्रात त्याचसोबत देशभरात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होतेय. देशभरातील ७५ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलंय. अशात संपूर्ण महाराष्ट्रात कलम १४४ लागू करण्यात आलाय. अशातही लोकं घराबाहेर पडत असल्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली.

"लॉकडाउन को अभी भी कई लोग गंभीरता से नहीं ले रहे हैं। कृपया करके अपने आप को बचाएं, अपने परिवार को बचाएं, निर्देशों का गंभीरता से पालन करें। राज्य सरकारों से मेरा अनुरोध है कि वो नियमों और कानूनों का पालन करवाएं। "

या शब्दात नरेंद्र मोदी यांनी देशभरातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. 

परिस्थितीचं गांभीर्य ओळखा ! मुंबईत १४ तर पुण्यात आणखी १ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

मात्र, या सर्व परिस्थितीला नरेंद्र मोदी हेच जबाबदार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. ट्विटरवरून संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर सडकून टीका केलीये.  

मोठी बातमी - मुंबईकरांचे भविष्य 'त्या' 402 प्रवाशांच्या हाती..

"आपल्या पंतप्रधानांना लॉकडाऊनमध्ये नागरिक रस्त्यावर फिरतायत, कोरोनाला गंभीरपणे घेत नसल्याने चिंता होतेय. मात्र प्रिय प्रधानमंत्रीजी, भीती आणि चिंतेच्या वातावरणात जर सणासारखं वातावरण निर्माण केलं जाणार असेल तर असंच होणार. सरकार जर गंभीर असेल तरच नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेतील. जय हिंद , जय महाराष्ट्र" म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींवर तिखट शब्दात टीका केलीये. 

shivsena MP sanjay raut reverts to PM modis tweet about corona and peoples behavior


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena MP sanjay raut reverts to PM modis tweet about corona and peoples behavior