आता महाविकास आघाडीने उचललं 'हे' अत्यंत आक्रमक पाऊल..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

  • 'राज्यपालांनी घेतलेला निर्णय रद्द करा'
  • शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव 

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीला आता शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने आक्षेप घेतलाय. याचं पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने सोबत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने थेट सुप्रीम कोर्टाची दारं ठोठावली आहेत. 

यामध्ये शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे तीनही पक्ष याचिकाकर्ते आहेत तर केंद्र सरकार. राज्य सरकार. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या विरुद्ध ही याचिका दाखल करण्यात आली आहे.  

 

Image may contain: text

 

No photo description available.

 

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात तीनही पक्षांनी आता सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होऊ शकते.  मात्र या याचिकेवर तातडीची सुनावणी करण्याची मागणी आता तीनही पक्षांकडून करण्यात येतेय. 

शिवसेनेच्या याचिकेला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची सहमती आहे. जो आदेश राज्यपालांनी दिला तो तात्काळ रद्द करावा, राज्यपालांचा आदेश घटनेला धरून नाही, असं या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयांना तात्काळ रद्द करा, अशी मागणी आता महाविकास आघाडीकडून केली जातेय. 

Webtitle : shivsena NCP and bjp filed petition appointment of CM and Deputy CM :


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena NCP and bjp filed petition appointment of CM and Deputy CM