महाराष्ट्राला डावलून केंद्राला कोणता घोडा पुढे सरकवायचा आहे - संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जानेवारी 2020

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या संचलनात यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ पाहायला मिळणार नाही. महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारल्यामुळे आता राजकीय वादाला तोंड फुटलंय.

शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी केद्र सरकारवर निशाणा साधलाय. महाराष्ट्र आणि  पश्चिम बंगालचे चित्ररथ यावेळी प्रजासत्ताक दिनी दिसु नयेत या मागे राजकिय षडयंत्र आहे काय? असा सवाल ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केलाय आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का? असं देखील संजय राऊत विचारतायत. 

महत्त्वाची बातमी :  खातेवाटप न झाल्याने वाढतेय मंत्रालयातील फाईल्सची संख्या..

महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात नेहमीच देशाचे आकर्षण ठरत आला. अनेकदा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचा आहे. हे काँग्रेस राजवटीत घडले असते तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती. आज गप्प का?

असं इथल्या मातीशी  वागणं योग्य नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केलंय. दर प्रजासत्तक दिन आला की आपल्या विचाराचा रथ दिल्लीत पाठवला जातो. मात्र राज्यातले सरकार बदललं आणि दिल्लीत या रथाला नाकारलं गेलं. सर्वाधिक समाजसुधारक या राज्यातून निर्माण झाले. स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्र राज्य अग्रगण्य होतं. असं इथल्या मातीशी  वागणं योग्य नाही. याचा बदला जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. असं राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणालेत.   

महत्त्वाची बातमी : नेरूळमध्ये दिवसाढवळ्या घडला 'हा' प्रकार; तक्रार दाखल

केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटले आहे. की प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली. हा देशाचा उत्सव असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे. परंतु सरकार आकसाने वागत असून विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. 

मोठी बातमी : शिवसेनेत नाराजीचा स्फोट..

WebTitle: shivsena rajyasabha MP sanjay raut on republic day parde and maharashtras tableau

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena rajyasabha MP sanjay raut on republic day parde and maharashtras tableau