निवडणुकांच्या अपयशाची शिवसेना घेणार झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

मुंबई - स्थानिक निवडणुकांमधील यशानंतर पक्ष वाढवण्यासाठी भाजपने राज्यभरात संपर्क मेळावे घेण्यास सुरुवात केल्यानंतर शिवसेनेने स्थानिक निवडणुकांच्या अपयशाची झाडाझडती घेण्याचे ठरवले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढील आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकांतील पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत.

जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिका निवडणुकांत शिवसेनेला अपेक्षित यश मिळालेले नाही. ठाण्यात एकहाती सत्ता आली. मुंबई महापालिकेत सत्ता असली तरी शिवसेना व भाजपमधील फरक नगण्य आहे. मुंबईतील वाढलेली भाजपची ताकद शिवसेनेला विचार करण्यास लावणारी आहे. फेब्रुवारीत सर्व निवडणुका आटोपल्यानंतर या अपयशाबाबत मंत्री, नेते व पदाधिकाऱ्यांची झाडाझडती ठाकरे घेतील, असे बोलले जात होते. मात्र, एक-दोन वेळा मंत्र्यांच्या खराब कामगिरीबद्दल त्यांना तंबी देण्यापलीकडे काहीच झाले नाही. भाजपने आता संपर्क मेळाव्यांच्या निमित्ताने राज्यात पक्ष वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता शिवसेनाही जागी झाली आहे. पुढील आठवड्यात वांद्रे येथील "रंगशारदा' सभागृहात जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी मंत्री आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक ठाकरे घेणार आहेत. त्यानंतर मुंबईतील विभागप्रमुखांचीही बैठक होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: shivsena review for election unsuccess