अखेर शिवसेनेने करीरोड ते लालबाग दुहेरी वाहतूक सुरू केली

mumbai
mumbai

मुंबई : वेळ: सकाळी 8 ची, स्थळ:लालबाग, भारत माता सिनेमा समोरील पदपथ. शिवसेना महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक करीरोड ब्रिज वरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना विनंती करतात, अहो  ताई अहो दादा या..या, इकडे या सह्या करा आपला त्रास वाचवायचाय. स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. कशाला? तर वाहतूक पोलीस अधिकारी आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांना निवेदन देण्यासाठी. हे दृश्य पाहताना हे काही शिवसेना पठडीतील आंदोलन आहे असे अजिबात वाटत नव्हते आणि काही वेळातच खासदार अरविंद सावंत आणि आमदार अजय चौधरी, आशिष चेंबूरकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, माजी आमदार दगडू सकपाळ हेही पोहचले. खा.सावंत यांनी स्वाक्षरी मोहीम पत्रकावर सही करीत एकेरी वाहतूकी बाबत वाहतूक पोलीस प्रशासनावर तोंडसुख घेतले.

ही खास श्रीमंतांसाठी एकेरी वाहतूक नियोजन करण्यात आलेले असून माझ्या विभागातील लोकांची, सर्वसामान्यांची मात्र मुद्दाम कोंडी करण्यात येत आहे.या संदर्भात वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांशी आमदार अजय चौधरी यांनी मिटींग घेऊनही काहीच उपयोग झाला नाही. मुंबई वाहतूक पोलिसांनी करी रोड आणि एल्फिन्स्टन रोड ब्रीज वर सुरू केलेल्या एकेरी वाहतूकीमुळे गिरणगावातील मुंबईकरांचा खोळंबा होतोय.पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवण्या ऐवजी बिघडवली'आहे.येथे हि एकेरी वाहतूक फक्त माॅल, फाईव्ह स्टार हाॅटेल, लक्झरी टाॅवर यांच्या सेवेसाठी पोलिसांनी सुरू केलेली आहे का?असा सवालही सावंत यांनी केला.तर आमदार अजय चौधरी यांनी एकेरी वाहतूकी मुळे सर्वसामान्यांची कोंडी झालीय. याच वाहतूक कोंडी विरूद्ध शिवसेनेचं धडक आंदोलन सुरू होतेय असे म्हणत पोलिसांविरुद्ध आपला संताप व्यक्त केला.

वाहतूक पोलीस उपायुक्त अशोक दुधे हे करीरोड ब्रिज वरून वाहतुकीतून मार्ग काढीत चालतच आंदोलन स्थळी आले.त्यांनी खासदार, आमदार यांच्याशी उभ्या उभ्या विनंती करीत आंदोलन मागे घ्या,वाहतूक कोंडी वाढतेय असे म्हणाले,त्यावर संतापलेल्या खा.सावंत आणि आ.चौधरी यांनी मिटिंग ,विनवण्या करून उपयोग नसल्याने आंदोलन होतेय असे म्हटले.त्यांनी दुधे यांनाच उलट प्रश्न केले त्यावर दुधे फक्त आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती करू लागले.तेव्हड्यात संतप्त महिला सैनिकांनी तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले.त्यात शिवसैनिक ही सामील झाले. वाहतूक पोलिसां विरुद्ध घोषणा देत, शिवसेना स्टाईल आंदोलन सुरू झाले.उपायुक्त दुधे यांनी मग सगळ्यांना शांततेचे आवाहन करीत तेथून उठविले आणि मग सगळेच निघाले करीरोड च्या चौका कडे. चौकात आल्यावर घोषणाबाजी करीत खा.सावंत यांनी पोलिसांचे एकही न ऐकता दुहेरी वाहतूक करिता वाहने वळविण्यास भाग पाडले.

वाहतूक पोलीस आणि बंदोबस्तावरील पोलीस सारा प्रकार शांतपणे पहात होते.मोठा गोंधळ, घोषणाबाजीत वाहतूक दुहेरी करीत लालबाग भारत माता कडे वळविण्यात आली.हे आंदोलन म्हणजे शिवसेनेची मरगळ झटकण्याचा एक भाग आहे का? या प्रश्नावर खा.सावंत म्हणाले की ,शिवसेना 50 वर्षे आंदोलनच करीत आलेली आहे.कसली मरगळ आम्ही नेहमी ताजे तवाने असतो. सामान्यांच्या प्रश्नांवर  आंदोलन शिवसेना करते हे लोकांना माहीत आहे.आम्ही दुहेरी वाहतूक सुरू केलेली असून होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यास आम्ही खंबीर आहोत.

वाहतूक उपायुक्त अशोक दुधे यांची आंदोलन मागे घ्यावी ही विनंती धुडकावत
करीरोड चौकातून लालबाग कडे दुहेरी वाहतूक सुरू केली. विशेष म्हणजे माजी आमदार दगडू सकपाळ यांच्या वाहना पाठोपाठ वाहने लालबागच्या दिशेने निघाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com