किरीट सोमय्या असो की त्यांचे कुटुंब, विरोधातच काम करणार: शिवसैनिक

Shivsena
Shivsena

मुंबई : ‘युती होवो अथवा न होवो भाजपचे खासदार किरीट सोमय्या अथवा त्यांच्या परिवारातील कोणताही उमेदवार समोर असेल तर शिवसैनिक त्यांच्या विरोधातच काम करतील, असा निर्धार ईशान्य मुंबई लोकसभेतील शिवसैनिकांनी केला आहे. 

मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी युती झाली तर किरीट सौमय्या याच्या नावाला कडाडून विरोध केला. 

किरीट सौमय्या हेच युतीचे उमेदवार झाले तर एकही शिवसैनिक त्यांना मतदान करणार नाही. किरीट सौमय्या याच्या विरोधात सर्व शिवसैनिक एकजिवाने काम करणार.
पक्षाने कारवाई केली तरी सर्व शिवसैनि सौमय्या यांच्या विरोधातच काम करणार. असे शिवसैनिकांनी ठाकरे यांच्या समोर स्पष्ट केले. 

ईशान्य मुंबईत शिवसेनेची मोठी ताकत असून भाजपला स्वबळावर हा  मतदारसंघ राखणे आव्हानात्मक आहे. त्यामुळे किरीट सौमय्या यांच्या समोर मोठी गंभीर समस्या निर्माण होण्याचे संकेत आहेत. 

दरम्यान सतत शिवसेनेवर आगपाखड करणारे सोमय्या मागील वर्षभरापासून शांत आहेत. पक्षश्रेष्ठींनीच त्यांना शांत राहण्याचे आदेश दिले असून त्यांची उमेदवारी देखील धोक्यात असल्याची चर्चा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com