शिवशाही आणि एसटी बसची धडक ; 40 जण जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

मुंबई : कारले खिंड येथे शिवशाही बस व एसटी बसमध्ये झालेल्या भीषण अपघात मध्ये 40 प्रवासी जखमी झाले आहेत समोरासमोर झालेल्या अपघातात दोन्ही बसचे चालक गंभिर जखमी झाले आहेत. त्यातील के एस लहाने हे गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी जेजे रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे.

कार्लेखिंड येथे सकाळी 09.30 वाजता एसटी क्रमांक - MH 14 BT 1877 खाजगी शिवशाही बस क्रंमाक - MH 14 GD 8739 यांच्यामध्ये समोरासमोर जोरदार टक्कर होवून आपघात झाला. एसटी महामंडळाची साधी बस ही पनवेलहून अलिबागकडे निघाली होती. तर खाजगी शिवशाही मुरुडहून स्वारगेटकडे निघाली होती. या अपघातात एसटी बसचे चालक के एस लहाणे हे गंभीर जखमी झाले आहेत. या आपघातात आता पर्यंत समजलेले माहितीनुसार 40 प्रवाशी जखमी झाले आहेत. दोन्ही बसेस समोरासमोर धडकल्याने अपघात झाला आहे. पुढील तपास अलिबाग पोलिस स्टेशनचे पोलीस करत आहेत

Web Title: Shivshahi and ST buses hit; 40 injured