कमी अंतरासाठी 'शिवशाही'ला पसंती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

मुंबई - एसटी बसमधून उपनगरांतील आणि कमी अंतराच्या प्रवासासाठी नागरिकांनी शिवशाही सेवेला पसंती दिल्याचे समोर आले आहे. ठाणे-बोरिवली मार्गावर शिवशाहीच्या दिवसाला तब्बल 72 फेऱ्या होतात आणि किलोमीटरमागे 66 रुपये उत्पन्न मिळते, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यात 298 मार्गांवर 1018 शिवशाही बसगाड्या धावतात. या सेवेतील बसगाड्यांच्या अपघातांचे प्रमाण जास्त असले, तरी खासगी आराम बसच्या तुलनेने प्रवाशांची संख्याही अधिक आहे. मुंबईनजीक ठाणे, बोरिवली, पनवेल, कल्याण, अलिबाग या मार्गांवरील शिवशाही बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद ध्यानात घेऊन एसटीने कमी अंतराच्या मार्गांवरील शिवशाही बसच्या फेऱ्या वाढवल्या आहेत.

Web Title: Shivshahi likes for a short distance