आत्महत्तेसाठी विद्युत टॉवरवर शोले स्टाईल ड्रामा : खाली उतरण्यासाठी दारूचे आमिष

दारूचे आमीष दाखवून खाली उतवण्यात पोलीस आणि अग्निशमन दलाला यश
Sholay style drama electric tower
Sholay style drama electric towersakal

उल्हासनगर : आत्महत्तेसाठी चक्क विद्युत टॉवरवर चढून ड्रामा करण्याऱ्या व्यक्तीला दारूचे आमीष दाखवून खाली उतवण्यात पोलीस आणि अग्निशमन दलाला यश आल्याची घटना आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उल्हासनगरात घडली.

कॅम्प 1 मधील शहाड फाटक परिसरात कोणार्क रेसिडेन्सी हे गृहसंकुल आहे.त्याच समोर असलेल्या टाटाच्या विद्युत टॉवरच्या टोकावर राधाकृष्ण भोईटे हा चढला होता.राधाकृष्ण हा जालन्यातील भिकारी असून पत्नीसह तो उल्हासनगर आला आहे.मात्र त्याचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्याने तो आत्महत्या करण्यासाठी या टॉवरवर चढला होता.

त्याला खाली उतरण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके आणि त्यांचे पथक आले, मात्र त्यांना बघून तो आणखी वर चढला.अखेर त्याला दारूच्या बाटलीचे आमिष दाखवताच तो खाली उतरू लागला.तो थोडा खाली आल्यानंतर उल्हासनगर पोलीस ठाण्याचे गोपनिय विभागाचे अमित शिंदे यांनी त्याचा पाय धरत त्याला पकडून ठेवले आणि अग्निशमन दलाच्या मदतीने सुखरूपपणे खाली उतरविले.राधाकृष्ण याला उपनिरीक्षक आफ्रिन बागवान यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती बाळू नेटके यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com