वसईत आता खेळाडूंसाठी शूटिंग रेंज सुविधा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

वसईमध्ये कला, क्रीडा याबाबत सातत्याने काम सुरू आहे. त्यामुळे या भागातून अनेक खेळाडू तयार होतील. एकूणच वसई-विरार महापालिका भविष्याचा वेध घेणार आहे, असे गौरवोद्‌गार अर्जुन पुरस्कार प्राप्त सुमा शिरूर यांनी येथे काढले. 

विरार  ः वसईमध्ये कला, क्रीडा याबाबत सातत्याने काम सुरू आहे. त्यामुळे या भागातून अनेक खेळाडू तयार होतील. एकूणच वसई-विरार महापालिका भविष्याचा वेध घेणार आहे, असे गौरवोद्‌गार अर्जुन पुरस्कार प्राप्त सुमा शिरूर यांनी येथे काढले. 

वसई-विरार महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटन करण्यात आले यावेळी सुमा शिरूर बोलत होती. तिच्या हस्ते वसई येथे उभारण्यात आलेल्या शूटिंग रेंजचे नुकतेच उद्‌घाटन झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हितेंद्र ठाकूर होते. 

या वेळी आमदार ठाकूर यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते म्हणाले, आम्ही काम करतो आणि बाकीचे मात्र आमच्यावर टीका करत असतात. आम्ही करत असलेल्या कामाच्याबाबत कोणतीही तक्रार असेल तर आपण यावर विरोधकांशी चर्चा करायला तयार आहोत. त्यांनी अजमेरा परिवाराचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमासाठी आमदार क्षितिज ठाकूर, महापौर प्रवीण शेट्टी, माजी महापौर नारायण मानकर, स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत, गटनेता अब्दुल हक पटेल, महिला बाल कल्याण समिती सभापती माया चौधरी, परिवहन समिती सभापती प्रितेश पाटील, आरोग्य समिती सभापती राजेंद्र कांबळी, प्रभाग समिती सभापती उमा पाटील, उद्योगपती जयेश अजमेरा, अजय खोखाणी, संदेश जाधव, नितीन राऊत आदी उपस्थित होते. फ्रॅंक आपटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्‍स यांनी आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shooting range feature in Vasai, near Palghar