आर्थिक वादातून दुकानदाराची हत्या; दोन आरोपींना दिल्लीतून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

आर्थिक वादातून दोन आरोपींनी एका दुकानदारांची हत्या केल्याची घटना गोवंडीमध्ये घडली आहे. याबाबत गोवंडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून दिल्ली येथून दोन आरोपींना ताब्यात घेतले.

Mumbai Crime : आर्थिक वादातून दुकानदाराची हत्या; दोन आरोपींना दिल्लीतून अटक

मुंबई - आर्थिक वादातून दोन आरोपींनी एका दुकानदारांची हत्या केल्याची घटना गोवंडीमध्ये घडली आहे. याबाबत गोवंडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून दिल्ली येथून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.चेंबूरमधील आचार्य महाविद्यालयासमोर सुभाष गुप्ता यांचे शिव पेपर मार्ट नावाने रद्दीचे दुकान आहे. सुभाष गुप्ता रविवारी 19 मार्च रोजी दुकानात होते. रात्री नऊच्या सुमारास दोघेजण त्यांच्या दुकानात आले. या दोघांनी सुभाष गुप्ता आणि त्यांचा मुलगा विष्णू गुप्ता यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. दोघाना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गुरुवारी 23 मार्चला सकाळी सुभाष गुप्ता यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गोवंडी पोलिसांनी याबाबत हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सुभाष गुप्ता यांची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपीना पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे . दरम्यान, आर्थिक वादातून सुभाष गुप्ता यंची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.