तूर डाळ देता का तूर डाळ 

गजानन चव्हाण
रविवार, 12 ऑगस्ट 2018

खारघर : पनवेल तालुक्यात असलेल्या सर्व दुकानात जवळपास 75 क्विंटल तूर डाळची आवश्यकता असताना केवळ दहा दुकानात चार क्विंटल वितरण करण्यात आली आहे. धान्य दुकानदारांनी शासनाकडे तूर डाळीचे पैसे भरून गेल्या दोन महिन्यापासून डाळ मिळत नसल्यामुळे डाळ देता का डाळ अशी वेळ दुकानादारावर आली आहे. 

खारघर : पनवेल तालुक्यात असलेल्या सर्व दुकानात जवळपास 75 क्विंटल तूर डाळची आवश्यकता असताना केवळ दहा दुकानात चार क्विंटल वितरण करण्यात आली आहे. धान्य दुकानदारांनी शासनाकडे तूर डाळीचे पैसे भरून गेल्या दोन महिन्यापासून डाळ मिळत नसल्यामुळे डाळ देता का डाळ अशी वेळ दुकानादारावर आली आहे. 

पनवेल तालुक्यात जवळपास 194 शिधावाटप दुकान आहेत. शासनाने मागील वर्षी नोव्हेंबर शासनाने तुरडाळचे परिपत्रक काढून 55 रुपये प्रती किली विक्री करावे असे आदेश काढल्यावर पुरवठा विभागाकडून जबरस्तीने दुकानदाराच्या माथी मारले जात असे, दरम्यान किरकोळ बाजारात उच्च दर्जाची सतर किलो दराने तूर डाळ मिळत असल्यामुळे शिधापत्रिकानी पाठ फिरवल्याने रेशन दुकानदार जबरदस्तीने डाळ विक्री करावी लागली. यावर्षी जून महिन्यात शासनाने शिधावाटप दुकनात 35 रुपये दराने तूर डाळ मिळेल असे सांगितल्याने तसेच पुढील महिन्यात येणारे गणेश उत्सव, आणि श्रावणात डाळीचे मागणी वाढणार या आशेने दुकानदारांनी शासनाकडे जून - जुलै महिन्यात डाळीसाठी पैसे भरूनही डाळ मिळत नसल्याचे बाब उघडकीस आली आहे.

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील194 शिधावाटप दुकानात जवळपास 75 क्विंटल डाळीची आवश्यकता असताना केवळ दहा दुकानात चार क्विंटल वितरण करण्यात आल्याची माहिती मिळाली. पुढील एक दोन महिन्यात घरोघरी गणेश उत्सव तसेच दसरा दिवाळी येत असल्यामुळे दुकानदारांनी डाळीसाठी शासनाकडे पैसे भरूनही डाळ मिळत नसल्यामुळे  डाळ देता का डाळ अशी वेळ दुकानादारावर आली आहे. 

स्थानिक आमदार ,जिल्हा पुरवठा अधिकारी आणि दुकानदार यांच्या नुकताच  बैठक पार पडली. दुकानदाराच्या समस्या निदर्शनास आणून दिल्या तसेच  शासनाकडे  तूरडाळीचे पैसे भरूनही  अध्यापही डाळ उपलब्ध झाली नाही.
-  भरत पाटील, अध्यक्ष, किरकोळ रॉकेल विक्रेते व रास्त भाव धान्य दुकान वेल्फेअर असोसिएशन

एप्रिल मे महिन्यात शासनांकडून मिळालेली अंदाजे दोन क्विंटल तुरडाळ 55 रुपये किलो दराने जबरदस्तीने कार्ड धारकांना विकावी लागली.त्यामुळे दोन महिन्यात तूरडाळीची मागणी केली नाही.पुढील महिन्यात गणेश उत्सवात डाळीची मागणी होणार आहे.त्यामुळे लवकरच मागणी करणार आहे.
- केसरीनाथ पाटील शिधावाटप दुकानदार 

 शिधावाटप दुकान देण्यासाठी अध्यापही तुरडाळ उपलब्ध झालेली नसल्यामुळे देता आले नाही.
- लीलाधर दुफारे जिल्हा पुरवठा अधिकारी 
 

Web Title: shortage of tur dal in market