कचरा उचलण्यासाठी वाहनांचा तुटवडा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

मुंबई - कचरा उचलण्यासाठी गाड्यांचा तुटवडा आहे. परिणामी, प्रत्येक विभागात कचऱ्याचे ढीग साचत आहेत. गाड्याच कमी असताना कचरा उचलायचा कसा, असा सवाल कर्मचारी विचारत आहेत. मात्र, कामगार आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशासनाकडून मेमो पाठवण्याचे सत्र सुरूच आहे. प्रशासनाच्या या आडमुठेपणा विरोधात सोमवारी संतप्त घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कामगारांनी माटुंगा विभाग कार्यालयावर धडक दिली. 

कचरा कमी झाल्याचे सांगत पालिका प्रशासनाने कचरा उचलणाऱ्या तब्बल 20 टक्के गाड्या कमी केल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण मुंबईत कचराकोंडी झाली आहे. पालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे मुंबईत दररोज जमा होणारा नऊ हजार टन कचरा आता साडेसात हजार टन झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे; मात्र हा दावा खोटा असल्याचा आरोप कामगारांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, कचरा कमी झाल्याचे सांगत कचरा उचलणाऱ्या तब्बल 20 टक्के गाड्या प्रशासनाने अचानक कमी केल्याने ऐन दिवाळीत संपूर्ण मुंबईत कचऱ्याचे ढीग साचले. यावर स्थायी समितीत सर्वपक्षीयांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर गाड्या वाढवण्याचे आश्‍वासन उपायुक्त विश्‍वास शंकरवार यांनी दिले; मात्र प्रत्यक्षात माटुंगा येथील पालिकेच्या विभागात अशा गाड्या वाढवल्या नसल्याचे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे संघटक रामचंद्र लिंबारे यांनी सांगितले. गाड्या कमी केल्याने कचरा कुठे टाकणार, असा प्रश्‍न कामगारांपुढे असतानाही साचलेल्या कचऱ्याबाबत प्रशासन मात्र कामगारांना मेमो देत आहे. प्रशासनाच्या या अन्यायकारक भूमिकेविरोधात विभाग कार्यालयाला कामगारांनी धडक दिली. 

Web Title: Shortage of vehicles to pick up garbage