''भाजप सोडायला माझ्या बाबांनी थोडा उशीरच केला'' - सोनाक्षी सिन्हा

sona_shatru
sona_shatru

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा पाडव्याचा मुहुर्त साधत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची औपचारिक घोषणा त्यांनी केली होती. यावर त्यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला प्रश्न विचारला असता ''माझ्या वडिलांनी हे आधिच करायला हवं होतं'', असे तिने म्हटले आहे.  

'माझ्या वडिलांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय बराच आधी घ्यायला पाहिजे होता. अटलजी आणि आडवाणीजी असल्यापासून माझ्या वडिलांनी पार्टीसाठी काम केले आहे. पण त्यांना पक्षाकडून उचित आदर देण्यात आला नाही नसल्याचे तिने म्हटले आहे. 

भाजपने पटनासाहिब इथून शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी दिली नाही त्यामुळे ते नाराज होते. यामुळेच त्यांनी भाजपला रामराम करून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि इतर पक्षांची मोट बांधून महागठबंधनला एकत्र ठेवण्यात शत्रुघ्न सिन्हा यांची महत्त्वाची भूमिका आहे, असे बोलले जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com