निशाण दाखवा आणि मोफत मिसळ खा! 

निशाण दाखवा आणि मोफत मिसळ खा! 

शिवडी : नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने घराबाहेर पडून मतदान करावे, यासाठी परळ पूर्व येथील "आय लव्ह मिसळ'च्या अभिषेक नकाशे आणि अभिजीत इंदप यांनी "एकावर एक फ्री मिसळ पाव' असा आगळावेगळा उपक्रम सोमवारी (ता. 21) राबविला.

याला हजारोंच्या संख्येने प्रतिसाद देत नागरिकांनी मतदान करत मिसळ पावचा आस्वाद घेतला. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करून राज्याच्या विकासासाठी योग्य सरकारची निवड करावी, यासाठी हा उपक्रम राबवल्याचे अभिषेक व अभिजीत यांनी सांगितले.

सोमवारी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत मतदान करणाऱ्यांना बोटावरील निशाण दाखवल्यानंतर एका मिसळवर दुसरी मिसळ मोफत देण्यात आली. याचा लाभ घेण्यासाठी मतदारांची हॉटेलबाहेर लांबच लांब रांग लागली होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com