"श्रीगणेश'च्या पुनर्बांधणीला खो? 

"श्रीगणेश'च्या पुनर्बांधणीला खो? 

नवी मुंबई - नेरूळ येथील मोडकळीस आलेल्या श्रीगणेश सोसायटीतील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या पालिकेच्या नोटिसीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हे स्थगिती आदेश म्हणजे "इमारत धोकादायक नाही,' असा निर्वाळा असल्याचा समज पसरवून भाजपच्या नेते मंडळींनी रहिवाशांची दिशाभूल करण्यास सुरुवात केली आहे. यावरून भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली आहे. 

महापालिकेने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास उशीर लावल्यामुळे प्रशासनाची बाजू न ऐकल्याने न्यायालयाने घरे रिकामी करण्यास तात्पुरती स्थगिती दिल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, न्यायालयाच्या नोटिशीचा सोयीनुसार अर्थ लावून रहिवाशांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम भाजपच्या पदाधिकारी मंगल घरत करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक व सोसायटीचे अध्यक्ष अशोक गावडे यांनी केला आहे; तर गावडेंचे आरोप घरत यांनी फेटाळून लावले आहेत. 

1993 मध्ये मुंबईतून नवी मुंबईत स्थलांतरीत झालेल्या व्यापाऱ्यांना सुमारे पाच एकराचा भूखंड रहिवासी आणि व्यावसायिक संकुलाकरिता देण्यात आला होता. त्यावर रहिवासी व वाणिज्यिक संकुल उभारल्यानंतर 1996 ला भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यावर इमारतीचा वापर सुरू झाला. इमारतींना आता 23 वर्षे उलटल्यानंतर बांधकामाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. काही घरांमध्ये स्लॅब कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे 30 सप्टेंबर 2018 रोजी झालेल्या सोसाटीच्या वार्षिक बैठकीत मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकासाचा ठराव एकमताने मंजूर झाला. त्यानुसार आयआयटी मुंबई या संस्थेतर्फे इमारतींचे बांधकाम परीक्षण करण्यात आले. त्या परीक्षणात इमारती पूर्णपणे तोडून नव्याने उभारण्याचा सल्ला आयआयटी मुंबईने त्यांच्या अहवालात दिला. पालिकेने श्रीगणेश सोसायटीला अतिधोकादाय इमारत म्हणून घोषित केले. तसेच पावसाळ्याआधीच घरे रिकामी करण्याची नोटीसही बजावली. त्या नोटिसीविरोधात न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान पालिकेने बाजू सादर न केल्यामुळे न्यायालयाने प्रथमदर्शनी घरे रिकामी करण्याच्या पालिकेच्या नोटिशीला स्थगिती दिली आहे. 

श्रीगणेश सोसायटीचे आणि दादर भाजीपाला मित्र मंडळाचा काहीही संबंध नाही, असे सिडकोने व सहायक दुय्यम निबंधकांनी सिद्ध केलेले पत्रक माझ्याकडे आहे. तसेच मी सोसायटी सदस्य असल्याचेही पत्र त्यांनी मला दिले आहे. मुंबई आयआयटीच्या अहवालात तातडीने दुरूस्त करा, असे सांगितले आहे. त्याचा अर्थ अतिधोकादायक इमारत होते असे नाही. मी सोसायटीत कोणताही संभ्रम निर्माण करीत नाही. 
मंगल घरत, भाजप उपाध्यक्ष 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com