श्रीवर्धन हदरलं ! शहरातून गावी आलेले 3 जण कोरोनाबाधित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

श्रीवर्धन तालुक्यातील खुजारे, वडवली आणि दिघी येथील तीन जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील खुजारे, वडवली आणि दिघी येथील तीन जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. काही दिवसांपूर्वी वडवलीमध्ये 55 वर्षीय व्यक्ती मुंबईतील खार येथून कुटुंबासह आले होते. तर खुजारे येथील व्यक्तीही मुंबईहून गावात आला होती. त्याचप्रमाणे दिघीमध्ये 15 मे रोजी एका खाजगी वाहनातून सुमारे 28 जण आले होते. या सर्वांना त्यांच्या घरामध्येच 28 दिवसाकरिता होम क्वारटाईन करण्यात आले होते. त्यामधील 23 वर्षीय तरुणी मुंबईमधील वडाळा भागातून दिघीमध्ये दाखल झाली होती.

महत्वाची बातमी सावधान..! मुंबईत "या" वयोगटातील कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक

वडवली व खुजारेमधील व्यक्तीचा तीन दिवसापूर्वी होम क्वारटाईन काळात आकस्मित मृत्यू झाल्याने या व्यक्तीचे स्वाब नमुने, त्यासोबतच दिघीमधील मुलीचे देखील नमुने पनवेल येथील खाजगी लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. या तिघांचे नमुने पॉसीटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन या रुग्णांच्या कुटुबीय व संपर्कात आलेल्या व्यक्तीची यादी बनवण्यास सुरुवात केली असून या सर्वांना तपासणीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिघी, वडवली व खुजारे या गावाचा परिसर पोलिसांनी सील केला आहे.

Shrivardhan shuddered 3 people who came to the village from the city were coronated


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shrivardhan shuddered 3 people who came to the village from the city were coronated