अभिनेत्री श्रुती उल्फतला सशर्त जामीन मंजूर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

मालिकेतील कोब्रा प्रकरण 
मुबई : टीव्ही मालिकेच्या प्रमोशनसाठी हातात कोब्रा पकडून व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी अटक झालेली अभिनेत्री श्रुती उल्फत हिला गुरुवारी (ता. 9) बोरिवली महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. 

टीव्ही मालिकेसाठी श्रुतीचे जिवंत कोब्रासह काही फोटो व व्हिडीओ बुधवारी व्हायरल झाले होते. यात तिने हातामध्ये कोब्रा धरल्याचे चित्रीकरण केले आहे. याबाबत काही प्राणिमित्र संघटनांनी आक्षेप घेतला होता. बुधवारी पोलिसांनी श्रुती हिच्याविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली होती. आज बोरिवली न्यायालयाने तिला सुरुवातीला 16 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर तिने जामिनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने पाच हजारांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला. 
 
Web Title: Shruti Ulfat cobra