एसटीच्या शयनयान गाड्या मुख्यालयात दाखल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

मुंबई : एसटीच्या नवीन बांधणीच्या 38 गाड्या मंगळवारी (ता. 12) रोजी एसटी मुख्यालयात दाखल होणार आहे. त्यानंतर राज्याच्या विविध आगारांमध्ये या गाड्या पाठवण्यात येणार असून, यासारख्याच 219 गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी बांधण्यात येत आहेत. त्यामुळे रातराणीच्या प्रवाशांना लांब पल्ल्यासाठी आरामदायक सेवा मिळणार आहे. 

एमजी ऑटोमोटिव्ह या कंपनीने या गाड्यांची बांधणी केली असून, भविष्यात यांसारख्या 219 गाड्या बांधण्यात येणार आहे. राज्यात सुमारे 450 मार्गांवर हिरकणी, रातराणी गाडीची सेवा आहे. त्या ठिकाणी आता या नवीन बांधणीच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे लांब पल्ल्यांवरील प्रवाशांना त्याचा लाभ घेता येणार असून, प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. 

एसटीच्या जुन्या आसनी, शयनयान गाडीचे भाडे प्रतिटप्पा 10 रुपये 20 पैसे आहे. तेच भाडे दर या नवीन गाड्यांनाही लागू असणार आहे. त्यामुळे जुन्याच दरांत नवीन गाडीमध्ये आरामदायक सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. 

नवीन बनावटीच्या 219 गाड्या सेवेत येणार आहे. त्या सर्व गाड्या राज्यातील विविध आगारांमध्ये पाठवल्या जाणार आहेत. मंगळवारी येणाऱ्या गाड्यांचे आरटीओतील सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर त्या रस्त्यांवर धावताना दिसतील. 
- राहुल तोरो, महाव्यवस्थापक, एसटी वाहतूक. 
 
web title : Shyanyan bus of ST arrive at headquarters

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shyanyan bus of ST arrive at headquarters