सिद्धार्थ महाविद्यालय विकास योजनेपासून दूर

डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या पाडलेल्या वस्तीगृहाचा विन वापराचा भुखंड.
डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या पाडलेल्या वस्तीगृहाचा विन वापराचा भुखंड.

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झालेल्या 28 वास्तूंचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता; मात्र त्यासाठी फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयाकडून प्रस्तावच आला नाही. त्यामुळे या महाविद्यालयासाठी सरकारला कोणतीही योजना राबवता आलेली नाही.

सरकारच्या समाज कल्याण विभागाने निवडलेल्या 28 वास्तूंमध्ये औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातील मध्यवर्ती अभ्यासिका आणि वाचनालय तसेच डॉ. आंबेडकर शिकलेल्या सातारा येथील एलिमेंटरी शाळेतील वाचनालय आणि ग्रंथालयाचा विकास करण्यात येणार आहे; मात्र यात त्यांनी सुरू केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयाचा समावेश नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या दोन्ही इमारती विकत घेण्यासाठी बाबासाहेबांनी स्वत: खर्च केला होता. पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या अनेक महत्त्वाच्या बैठका या महाविद्यालयात झाल्या होत्या. डॉ. आंबेडकर या बैठकांना उपस्थित असत. त्यामुळे या महाविद्यालयाचा विकास योजनेत समावेश नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात होते. या महाविद्यालयाकडून प्रस्तावच न आल्याने तिथे योजना राबवता आली नाही, असे समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.

वसतिगृह उभारण्याची तयारी
वडाळा येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या वसतिगृहाची इमारत धोकादायक झाल्यामुळे दोन वर्षांपूर्वी पाडण्यात आली. ती अद्याप उभारण्यात आलेली नाही. हे बांधकाम करण्याची तयारी समाजकल्याण विभागाने दाखवली आहे. त्यासाठी संस्थेकडून राज्य सरकारला प्रस्ताव पाठवण्याची गरज आहे, असे मंत्री बडोले यांनी सांगितले. डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ग्रामीण भागातून, विशेषतः कोकणातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. सध्या वसतिगृह नसल्याने हे विद्यार्थी दुसरीकडे राहतात. वसतिगृह उभे राहिल्यास या विद्यार्थ्यांची चांगली सोय होऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक वाढू शकेल, असे या महाविद्यालयाच्या एका माजी प्राध्यापकांनी सांगितले.

दोन वर्षांपूर्वी पाडण्यात आलेल्या वडाळा येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या वसतिगृहाची जागा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com