सिद्धिविनायक ट्रस्टने घेतली शहीदांच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी

Siddhivinay trust will take care of martyard s children education
Siddhivinay trust will take care of martyard s children education

मुंबई : शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीला श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास पुढे आलं असून शहिदांच्या मुलांचा 'केजी' ते 'पीजी' पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी ही माहिती दिली आहे.

देशाच्या सीमेवर महाराष्ट्रातील जवान मोठ्या संख्यने तैनात आहेत. सीमेवर होणाऱ्या चकमकीत मराठी जवानांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. देशाचं रक्षण करताना अनेक मराठी जवानांना हुत्तामा व्हावं लागतं. शहिद कुटुंबांच्या मुलांच्या डोक्यावर आता सिद्धीविनायक मंदिर न्यासाने वडिलकीचं छत्र धरलंय. 

यापुढील महाराष्ट्रातील शहिद जवानांच्या कुटुंबातील मुलांचा 'केजी' ते 'पीजी' पर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च सिद्धीविनायक मंदिर न्यास करणार असल्याचं न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी जाहीर केलंय. आज कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने त्यांनी ही घोषणा केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com