सिग्नल बिघाडाचा प्रवाशांना फटका

सिग्नल बिघाडाचा प्रवाशांना फटका

मुंबई : मध्य आणि पश्‍चिम रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत तीन वर्षांत तब्बल १४ हजार ३५१ वेळा बिघाड झाल्याचे समोर आले आहे. जानेवारी २०१६ ते सप्टेंबर २०१९ या काळात मध्य रेल्वेवर ९८४७ वेळा आणि पश्‍चिम रेल्वेवर ४५०४ वेळा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाले. परिणामी रेल्वे वाहतूक विस्कळित झाल्याने प्रवाशांचे हालसत्र सुरूच राहिले.

मध्य आणि पश्‍चिम रेल्वेच्या प्रवाशांना नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हालअपेष्टांना सामोरे जावे लागते. माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्ते समीर झवेरी यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन वर्षांत मध्य आणि पश्‍चिम रेल्वेवर १४ हजार ३५१ वेळा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाले. मागील आर्थिक वर्षात (२०१७-१८) दररोज सरासरी तीन वेळा सिग्नलमध्ये बिघाड झाल्याची माहिती आरटीआय अर्जाच्या उत्तरातून मिळाली आहे.

जानेवारी २०१६ ते सप्टेंबर २०१९ पर्यंत मध्य आणि पश्‍चिम रेल्वेवर किती वेळा सिग्नल व इंजिनात बिघाड झाले, याबाबत झवेरी यांनी माहिती मागितली होती. या उत्तरातून पश्‍चिम रेल्वेवर तीन वर्षांत ४५०४ बिघाड झाल्याची माहिती समोर आली.

२०१७-१८ या आर्थिक वर्षात १०६३ वेळा सिग्नलमध्ये बिघाड झाल्याचे उघड झाले आहे. १ एप्रिल २०१९ ते ३० सप्टेंबर २०१९ या काळात सिग्नलमधील बिघाडाच्या ५९२ घटना घडल्या.

२०१८-१९ या वर्षात दररोज सरासरी तीन वेळा सिग्नलमध्ये बिघाड झाला. या वर्षी १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या नऊ महिन्यांत सिग्नलमध्ये ५९२ वेळा बिघाड झाल्याचे समोर आले आहे. मध्य रेल्वेवर जानेवारी २०१६ ते सप्टेंबर २०१९ या काळात ९८४७ वेळा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि ३२३ वेळा रुळाला तडे जाण्याच्या घटना घडल्या.


बिघाडसत्र 
(जानेवारी २०१६ ते सप्टेंबर २०१९)
बिघाड      मध्य रेल्वे      पश्‍चिम रेल्वे
सिग्नल यंत्रणा    ९८४७          ४५०४
रुळाला तडे     ३२३           ९३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com