वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालिकेतर्फे सात ठिकाणी सिग्नल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

नवी मुंबई - महापालिका क्षेत्रातील वाहनांची वाढती संख्या व त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील चौकात होत असलेली वाहतूक कोंडी बघता वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने शहरातील वर्दळीच्या सात मध्यवर्ती चौकात वाहतूक सिग्नल बसविण्यात आले आहेत. याविषयी वाहतूक पोलिस विभागाच्या वतीने सातत्याने आढावा घेतला जात होता, त्या सर्वेक्षणानुसार शहरात असलेल्या सिग्नल यंत्रणेमध्ये आणखी काही ठिकाणी भर घालणे गरजेचे असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी सूचित केले होते. 

त्यास अनुसरून वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आणखी सात ठिकाणी सिग्नल बसविण्यास मंजुरी प्राप्त होऊन विद्युत विभागामार्फत ते काम तातडीने पूर्ण करण्यात आल्याने त्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यास मोलाची मदत होणार आहे. यामध्ये एम.आय.डी.सी. भागात महापे येथे सरोवर पोर्टिगो जंक्‍शन, महापे-शिळ रोडवर महापे सर्कल, इंदिरानगरजवळ एव्हरेस्ट सर्कल, महापे रोडवर नेल्को जंक्‍शन, सविता केमिकल्स जंक्‍शन, हनुमाननगर, महापे इंदिरानगर रोडवरील शालिमार चौक अशा सात ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. या नव्या सिग्नल यंत्रणेमुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे; तसेच ध्वनी व वायुप्रदूषणात घट होऊन पर्यायाने पर्यावरणाचे हित साधले जाणार आहे. 

60 लाखांचा खर्च 
नवी मुंबई महापालिका अभियांत्रिकी विभाग आणि नवी मुंबई वाहतूक पोलिस विभाग यांनी सर्वेक्षण करून सूचित केल्याप्रमाणे या सात महत्त्वाच्या ठिकाणी अद्ययावत सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी सुमारे 60 लाख इतका खर्च करण्यात आला आहे. सिग्नल यंत्रणा बसविल्यामुळे तेथील वाहतूक कोंडी टळणार आहे. 

Web Title: Signals from seven places by municipal corporation To avoid traffic jams