सिंधी टक्का घसरल्याची चिंता 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

उल्हासनगर - राज्याचे निवडणूक आयुक्त सहारिया यांनी प्रशासकीय, पोलिस यंत्रणेसह उल्हासनगरातील निवडणूक परिस्थितीचा आढावा घेतला. सिंधी मतदानाच्या घसरलेल्या टक्‍क्‍याविषयी किंबहुना उदासीनतेबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. 

उल्हासनगर - राज्याचे निवडणूक आयुक्त सहारिया यांनी प्रशासकीय, पोलिस यंत्रणेसह उल्हासनगरातील निवडणूक परिस्थितीचा आढावा घेतला. सिंधी मतदानाच्या घसरलेल्या टक्‍क्‍याविषयी किंबहुना उदासीनतेबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. 

पालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी मतदान करणाऱ्या नागरिकांना हॉटेलमध्ये 20 टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे. या मोहिमेत हॉटेल व्यावसायिक प्रकाश शेट्टी, दयानंद शेट्टी यांनी महत्त्वाचा सहभाग घेतला. त्यांचे सहारिया यांनी कौतुक केले. नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे स्पष्ट करत आयुक्तांनी केलेल्या सुनियोजित जागृती मोहिमेमुळे या वेळी सिंधी मतदार नक्कीच मतदानासाठी बाहेर पडतील आणि मतदानाचा टक्का वाढेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. सहारिया यांनी पेड न्यूजसंदर्भातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. उपायुक्त मुख्यालय डॉ. विजया कंठे, आचारसंहिता पथकप्रमुख विजया जाधव, उपायुक्त जमीर लेंगरेकर, जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे, प्रोग्रामर श्रद्धा सपकाळे या वेळी उपस्थित होते. 

व्हॉट्‌सऍपवर वॉच 
अनेक उमेदवार सोशल मीडियावर सर्सास प्रचार करत आहेत. त्यात व्हॉट्‌सऍपचे प्रमाण जास्त आहे. 19 फेब्रुवारीनंतर त्यावर वॉच असेल. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध थेट कारवाई होणार असल्याची माहिती आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली. 

व्यापारी सरसावले 
हॉटेल व्यावसायिक प्रकाश शेट्टी, दयानंद शेट्टी यांनी मतदान करणाऱ्या नागरिकांना 20 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास फर्निचर, इलेक्‍ट्रॉनिक, कापड व्यापाऱ्यांनी सहकार्य देण्याचे ठरवले आहे. त्यांनीही वस्तूंवर सवलत देण्याची भूमिका घेतली आहे. "मतदान करा आणि 20 टक्के 21 ते 23 तारखेपर्यंत सवलत मिळवा,' असे आवाहन व्यापारी करणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. 

Web Title: Sindhi percent decline in concern