esakal | अवधूत गुप्ते करणार क्राऊडसोर्स्ड गणपती आरती
sakal

बोलून बातमी शोधा

avdhoot gupte

अवधूत गुप्ते करणार क्राऊडसोर्स्ड गणपती आरती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गणेशोत्सवाचा आनंद, उत्साह द्विगुणित करण्यासाठी संगीतकार व गायक अवधूत गुप्ते आणि गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम हेअर कलर हे एकत्र येऊन पहिली क्राऊडसोर्स्ड गणपती आरती तयार करणार आहेत.
 
अवधूत गुप्ते यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर प्रोफाईलवर क्राऊडसोर्स्ड गणपती आरती तयार करत असल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. गुप्ते यांनी व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, गणपतीबाप्पा आपल्या अनेक रूपांमधून आपल्या जीवनात आनंदाचे, पावित्र्याचे रंग भरत असतात. श्रीगणेश ही अष्टपैलू आणि बहुगुणी देवता आहे, त्यामुळे त्यांची स्तुती करणारी आरती अतिशय अनोखी आणि वैविध्यपूर्ण असायला हवी. "लाईफ को रंगों से भरने तू आया, सब का तू देवा, सब का तू देवा"   गणेशभक्तांनी देखील मोठ्या संख्येने आणि उत्साहाने या उपक्रमात सहभागी होऊन आरतीच्या ओळी सुचवाव्यात असे आवाहन केले आहे. या ओळींवरून गुप्ते गणेश आरती रचतील आणि अशातऱ्हेने "बाप्पा के आरती का नया अवतार" अर्थात बाप्पाच्या आरतीचा नवा अवतार निर्माण होईल.

गुप्ते म्हणाले, "गेली अनेक वर्षे लोकांना एकजूट करण्याच्या कमी गणेशोत्सव मोलाची भूमिका बजावत आहे. यंदा मी आणि गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम हेअर कलर एकत्र येऊन गणेश आरतीचा नवा अवतार सादर करून काही अनोखे आणि नवे करू पाहत आहोत. ही आरती जरी नवी असली तरी लोकांना एकजूट करण्याचा गणेशोत्सवाचा मूळ उद्देश त्यातून साध्य केला जाणार आहे.  म्हणूनच आम्ही या आरतीचे बोल क्राऊडसोर्स करणार आहोत. श्रीगणेश भक्तांनी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने या उपक्रमात सहभागी व्हावे आणि अतिशय अनोख्या पद्धतीने गणेशाचे स्वागत करावे.'

पहिल्या क्राऊडसोर्स्ड गणपती आरतीबद्दल गोदरेज प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) चे भारत आणि सार्कचे सीईओ सुनील कटारिया म्हणाले, "गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशभरातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे. श्रीगणेशाची पहिली क्राऊडसोर्स्ड आरती तयार करण्याच्या गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम उपक्रमामुळे हा उत्सव लोकांना अतिशय अनोख्या पद्धतीने सामावून घेणारा आणि संस्मरणीय ठरावा हा आमचा उद्देश आहे. भारतातील आघाडीच्या संगीतकारांपैकी एक अवधूत गुप्ते यांच्यासोबत हा उपक्रम केला जात असल्यामुळे ही आरती अतिशय भावपूर्ण आणि लोकप्रिय ठरेल याची खात्री आहे. या उपक्रमामुळे यंदाच्या गणेशोत्सवात आम्ही आनंदाचे, उत्साहाचे आगळेवेगळे रंग निर्माण करू."

पुढच्या आठवड्यापासून गुप्ते आरतीच्या संगीतरचनेचे काम सुरु करणार आहेत. भारतातील कोणत्याही भागातील कोणीही व्यक्ती या उपक्रमात सहभागी होऊ शकते. गुप्ते यांच्या इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर प्रोफाईल्सवर जाऊन आणि कमेंट सेक्शनमध्ये स्वतः रचलेल्या आरतीच्या ओळी पोस्ट करायच्या आहेत. गुप्ते आणि गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम हेअर कलर या क्राऊडसोर्स्ड गणपतीचे आरतीचे प्रकाशन त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईल्सवर गणेशोत्सवादरम्यान करतील.

loading image
go to top