मुंबईकरांची गती वाढणार; ...हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 मार्च 2020

शीव उड्डाणपूल सोमवारी (ता. 9) पहाटे 6 वाजता वाहतुकीसाठी पुन्हा सुरू झाला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दुरुस्तीच्या तिसऱ्या टप्प्यात उड्डाणपुलाची 16 बेअरिंग बदलली.

मुंबई : शीव उड्डाणपूल सोमवारी (ता. 9) पहाटे 6 वाजता वाहतुकीसाठी पुन्हा सुरू झाला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दुरुस्तीच्या तिसऱ्या टप्प्यात उड्डाणपुलाची 16 बेअरिंग बदलली. बेअरिंग बदलण्याचे काम 6 एप्रिलपर्यंत आठवड्यातील चार दिवस केले जाईल. या विशेष कामासाठी मुंबई वाहतूक विभागाने आठ ट्रॅफिक ब्लॉक मंजूर केले आहेत. 

ही बातमी वाचली का? सावधान! आजच सोडा धुम्रपान, नाहीतर भोगा हे परिणाम 

वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला शीव उड्डाणपूल मुंबई शहर आणि उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. दोन वर्षांपूर्वी आयआयटी मुंबईने या पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करून 170 बेअरिंग बदलण्याची शिफारस केली होती. सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेऊन अवजड वाहनांना उड्डाणपुलावरून जाण्यास बंदी घालण्यात आली. त्यानंतर 14 फेब्रुवारीपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. आतापर्यंत तीन टप्प्यांत या उड्डाणपुलाची 80 बेअरिंग बदलण्यात आली आहेत. तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारी उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली. हे काम एप्रिलपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज एमएसआरडीसीने व्यक्त केला आहे. 

ही बातमी वाचली का? भारतीय महिलांना एकट्याने "हे' करायला आवडतं!

सलग 20 दिवस बंद 
बेअरिंग बदलण्याचे काम पूर्ण झाल्यावर शीव उड्डाणपुलाचे एक्‍स्पान्शन जॉईंट बदलण्याचे व डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात येईल. या कामासाठी उड्डाणपूल सलग 20 दिवस बंद ठेवण्याचे नियोजन आहे. हे काम 6 एप्रिलनंतर सुरू करण्यात येणार आहे. 

ट्रॅफिक ब्लॉक (रात्री 10 ते सकाळी 6) 

  •  12 ते 16 मार्च 
  •  19 ते 23 मार्च 
  •  26 ते 30 मार्च 
  •  2 ते 6 एप्रिल 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sion flyover start to fly again