छोटा सायन रुग्णालयाची दुरवस्था

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

धारावी - धारावीतील महापालिकेचे ‘छोटा सायन’ रुग्णालय म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोकमान्य सर्वसाधारण रुग्णालयाचे माता व शिशु रुग्णालय व नागरी आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली आहे. परिणामी रुग्णांना गैरसोईला तोंड द्यावे लागत आहे.

धारावी - धारावीतील महापालिकेचे ‘छोटा सायन’ रुग्णालय म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोकमान्य सर्वसाधारण रुग्णालयाचे माता व शिशु रुग्णालय व नागरी आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली आहे. परिणामी रुग्णांना गैरसोईला तोंड द्यावे लागत आहे.

वसतिगृह व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थानाची सर्वाधिक दुरवस्था झाली आहे. चार मजली असलेल्या इमारतीच्या जिन्यांना तडे गेले आहेत. आरोग्य केंद्रासमोरच राडारोडा व कचरा पडून आहे. रुग्णांना केंद्रात शिरतानाच नाक मुठीत धरून जावे लागत आहे. प्रवेशद्वारासमोर अनेक दिवसांपासून एक बंद मोटार उभी आहे. वारंवार तक्रारी करूनही काही उपयोग होत नाही, अशी तक्रार रुग्ण करत आहेत. रुग्णालयाच्या दुर्दशेमुळे तिथे राहणाऱ्या डॉक्‍टरांचीही कुचंबणा होत आहे. रुग्णालयाच्या सहायक अधिष्ठात्यांनीही गैरसोई असल्याचे मान्य केले; मात्र लवकरच दुरुस्ती होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.  

चौथ्या मजल्यावरील वसतिगृहातही अशीच परिस्थिती आहे. जागा अपुरी असल्याने त्याला कोंडवाड्याचे स्वरूप आले आहे. तेथील भिंतींना जागोजागी तडे गेले आहेत. स्लॅबचे प्लास्टर गळत आहे. पावसात पाणीही तुंबते, अशी तक्रार रुग्णांनी केली. 

रुग्णालयात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. इमारतीच्या गच्चीवरून गळती आहे. पाण्याच्या टाक्‍या तुटलेल्या आहेत. या सर्व बाबींची लेखी माहिती वरिष्ठांना दिली आहे. पावसाळ्यानंतर दुरुस्तीस सुरुवात होणार आहे. 
- डॉ. खिमजी गोहील, सहायक अधिष्ठाता

Web Title: sion hospital mumbai condition