वाहतूक पोलिसांनी बुजवले खड्डे !

गजानन चव्हाण
रविवार, 8 जुलै 2018

जीवघेणा खड्डे पाहून अचानक वाहन चालकांना ब्रेक लावा लागत असल्यामुळे मागून येणाऱ्या वाहनाच्या किरकोळ अपघाताच्या घटना घडत असल्यामुळे खारघर वाहतूक पोलिसांनी हातात फावडे आणि घमेल घेवून बुजवून रस्ता मोकळा करीत असल्याचे दिसून येते.

खारघर - सायन पनवेल महामार्गावर खारघर कोपरा पुलाजवळ पडलेल्या खड्ड्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खारघर वाहतूक पोलिसांनी हातात फावडे आणि घमेले घेवून खड्डे बुजवून कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

सायन पनवेल महामार्गावर कोपरा पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे हिरानंदानी पूल ते कोपरा पुला दरम्यान वाहनाच्या रांगा पहावयास मिळत आहेत. सदर रस्त्यावरील पथदिवे बंद असल्यामुळे पहाटेच्यावेळी मागील महिन्यात दोन वेळा डांबरच्या टँकरच्या अपघाताच्या घटना घडल्या होत्या. विशेषतः रस्त्यावरील बंद पथदिवे आणि रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे. मात्र सदर विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. पनवेल कडे जाताना कोपरा पुलावरून खाली उतरताना पडलेले जीवघेणा खड्डे पाहून अचानक वाहन चालकांना ब्रेक लावा लागत असल्यामुळे मागून येणाऱ्या वाहनाच्या किरकोळ अपघाताच्या घटना घडत असल्यामुळे खारघर वाहतूक पोलिसांनी हातात फावडे आणि घमेल घेवून बुजवून रस्ता मोकळा करीत असल्याचे दिसून येते. मागील वर्षीही खारघर वाहतूक पोलिसांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून खडी आणून खड्डे बुजविले होते. 

गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे बेलापूर कडून पनवेल कडे जाणाऱ्या महार्गारावरील कोपरापुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. त्यामुळे कोपरा ते हिरानंदानी पूल मीटर पर्यंतच्या वाहनाच्या रांगा पहावयास मिळत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून होणारी वाहतूक कोंडी टाळावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

कोपरा पुलंदरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्डयामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात होवू नये म्हणून आम्ही खड्डे बुजवून वाहन चालकांसाठी रस्ता मोकळा करीत आहे. - प्रवीण पांडे सहाय्य्क पोलिस निरीक्षक वाहतूक विभाग खारघर 
 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: sion panvel road is in bad condition