esakal | सायनमधील शाळेत औषधांची फवारणी | Sion
sakal

बोलून बातमी शोधा

 Drug spraying

सायनमधील शाळेत औषधांची फवारणी

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

वडाळा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (corona) बंद असलेल्या शाळा सुरू करण्यात येत आहेत. कित्येक कालावधीपासून बंद असलेले वर्ग आणि शाळेचा परिसर येथे साचलेली धूळ, कचरा यामुळे विद्यार्थ्यांना अल्पावधीत गंभीर आजारांचा (serous decease) सामना करावा लागू शकतो.

हेही वाचा: मुंबईत लेप्टोसह डेंग्यूचा धोका वाढला

यावर नियंत्रण मिळविण्यासाठी व वाढत्या डेंग्यूच्या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना कोणताही उपद्रव होऊ नये याकरिता सायन येथील डी. एस. हायस्कूल येथे कोरोनायोद्धा अशोक कुर्मी यांनी सहकऱ्यांच्या मदतीने आज शाळेतील प्रत्येक वर्गात व शाळा परिसरात निर्जंतुकीकरण व डास प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी केली. लवकरच सायन, सायन प्रतीक्षानगर, धारावी, माटुंगा येथील शाळांमध्येदेखील निर्जंतुकीकरण व डास प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती कुर्मी यांनी दिली.

loading image
go to top