Darshan Solanki Case : दर्शन सोलंकीच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करा; भालचंद्र मुणगेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SIT inquiry of btech student Darshan Solanki death case Bhalchandra Mungekar mumbai crime police

Darshan Solanki Case : दर्शन सोलंकीच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करा; भालचंद्र मुणगेकर

मुंबई : आयआयटी मुंबईतील बीटेक अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असलेल्या दर्शन सोलंकीच्या आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी राज्यसभेचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे.

येत्या १ मार्च रोजी विविध संघटनांच्या माध्यमातून या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यासाठी आंदोलनही करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दर्शन सोलंकीच्या मृत्यूनंतर ज्या गुप्त पद्धतीने त्याचे पोस्टमार्टम घाईत करण्यात आले त्यामुळे शंकेला वाव आहे. महत्वाचे म्हणजे त्याचे कुटुंबीय मुंबईत येण्यापूर्वीच हे पोस्टमार्टम पूर्ण करण्यात आले. त्याच्या कुटुंबात वडिलांनाही मृत्यूची बातमी देण्यात आली नव्हती.

त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आयआयटीतील अंतर्गत समिती एवजी एसआयटी नेमण्याची मागणी मुणगेकर यांनी केली. या मागणीच्या निमित्ताने येत्या दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत १ मार्चला होणाऱ्या आंदोलनासाठी दर्शन सोलंकीचे वडिल रमेश सोलंकी यांच्याशीही बोलणे झाल्याचे त्यांनी सांगितले. दर्शन सोलंकी हा १९ वर्षीय एकुणता एक असा मुलगा होता. आयआयटी मुंबईतील जातीयवादाला कंटाळूनच त्याने टोकाचे पाऊल उचलले. परंतु त्याच्या मृत्यूच्या बाबतीत हॉस्टेलच्या भींतीवर लिहिण्यात आलेले वाक्यही संशयास्पद असल्याचा आरोप मुणगेकर यांनी केला.

दर्शन सोलंकीच्या रूममध्ये माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये, असे वाक्य लिहिल्याचे आढळले. परंतु हे वाक्य नेमके कुणी लिहिले असाही सवाल मुणगेकरांनी यावेळी केला. या प्रकरणाची दखल केंद्रीय मंत्रीमंडळानेही अतिशय गांभीर्याने घेतली आहे.

त्यासोबतच राज्य सरकारच्या पातळीवर एसआयटीच्या मागणीसाठी आम्ही जोर लावणार असल्याचे ते म्हणाले. केंद्रापाठोपाठच राज्याच्या गृहमंत्र्यांकडे या मागणीला जोर लावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.