शिवस्मारक समुद्राऐवजी रेसकोर्सवर उभारा - तांडेल

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

मुंबई - अरबी समुद्रात शिवस्मारक उभारले, तर दोन लाखांहून अधिक मच्छीमारांच्या रोजगारावर गदा येईल, अशी भीती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी व्यक्‍त केली आहे. शिवस्मारक अरबी समुद्राऐवजी रेसकोर्सच्या जागेवर उभारल्यास सामान्यजनांनाही तिथे सहज पोचता येईल, असेही त्यांनी सुचवले आहे.

पंतप्रधानांच्या उपस्थितीत राज्य सरकारने नियोजित स्मारकाच्या भूमिपूजनाचा प्रयत्न केल्यास तो उधळून लावण्याचा इशाराही तांडेल यांनी पत्रकार परिषदेत दिला. असा प्रयत्न झाल्यास पाच हजार बोटी समुद्रात उतरवून आम्ही निषेध नोंदवू, असे ते म्हणाले.

अरबी समुद्रात शिवस्मारक उभारल्यास पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होऊन मासेमारी संकटात येईल, असे म्हणत तांडेल यांनी याविरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली आहे. हे बांधकाम केल्यास समुद्रातील पाणी आणि लाटांच्या नैसर्गिक वहनाला कायमस्वरूपी अडथळा निर्माण होईल. पूर व वादळांमुळे किनारपट्‌टीचे नुकसान होईल. समुद्रातील व किनारी प्रदेशातील प्रदेश नियमन कायद्याचेही यामुळे उल्लंघन होईल, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

या ठिकाणी कोणतेही खोदकाम केले जाणार नाही, असा राज्य सरकारने केलेला युक्‍तिवाद लंगडा असल्याचा आरोप तांडेल यांनी केला. ते म्हणाले, की समुद्रात शिवस्मारक केवळ टक्‍केवारीसाठी बांधले जात आहे.

Web Title: Sivasmaraka up on the racecourse