दिवाळीत रेल्वेच्या सहा अतिरिक्त गाड्या 

दिवाळीत रेल्वेच्या सहा अतिरिक्त गाड्या 

मुंबई : दिवाळीनिमित्त रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने विशेष सोय केली आहे. सणासाठी घरी जाणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता सहा अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वे विभागाने घेतला आहे. 

दिवाळीच्या काळात प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटीने नियोजन केले असताना रेल्वेनेही प्रवाशांची गर्दी लक्षात घेता नियोजन केले आहे. यासाठी सीएसएमटी-मंडुवाडीह, सीएसएमटी-संतरागाछी आणि पुणे-गोरखपूर या मार्गांवर अतिरिक्त सहा गाड्या धावणार आहेत. सीएसएमटी-मंडुवाडीह ही रेल्वे जबलपूर मार्गे अलाहाबादला जाणार आहे. त्याचप्रमाणे पुणे-गोरखपूर ही रेल्वे जबलपूर मार्गे सीएसएमटी-संतरागाछी एक्‍स्प्रेस नागपूर मार्गे टाटानगरला पोहचणार आहे. त्यामुळे दिवाळीसाठी रेल्वेने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com