खालापूर एक्स्प्रेस वेवर 6 गाड्यांची एकमेकांना धडक, जीवितहानी टळली

अनिल पाटील | Sunday, 22 November 2020

रविवारी सकाळी अकराच्या सुमारास एक्सप्रेस वे वरील आडोशी बोगद्याजवळ सहा वाहने एकमेकांना धडकले. यात सहाही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

मुंबई-  दिवाळीचा मोसम संपल्यावर अनेक कुटुंबे हिवाळी पर्यटनासाठी घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे एक्सप्रेस वे सहित खोपोली-खालापूरातील सर्व रस्ते आणि महामार्ग चार चाकी वाहनांनी फुल आहेत. सर्वाधिक वाहने एक्सप्रेस वे वर आल्याने वाहतूक कोंडीसहीत अपघात घडत आहेत. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास एक्सप्रेस वे वरील आडोशी बोगद्याजवळ सहा वाहने एकमेकांना धडकले. यात सहाही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघाताची तीव्रता बघता मोठी आपत्कालीन स्थिती निर्माण झाली मात्र सुदैवाने यात जीवित हानी मात्र टळली आहे.

अधिक वाचारझा अकादमीचं राज्यपालांना पत्र, नमाजासाठी राजभवनाची मशीद उघडा

अपघाताची माहिती मिळताच एक्सप्रेस वरील आयआरबी वाहतूक नियंत्रण व्यवस्था, अपघातसमयी मदतीसाठी असलेली डेल्टा फोर्स, खोपोली पोलिस आणि महामार्ग वाहतूक पोलिसांनी तातडीने सर्व अपघात ग्रस्त नागरिक आणि वाहनांना तातडीने योग्य मदत केली. तसेच एक्सप्रेस वे सुरळीत वाहतुकीसाठी योग्य प्रयत्न केल्याने दहा ते पंधरा मिनिटात परिस्थिती सामान्य होऊन येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

six car collided with each other on khopali Khalapur Expressway