दोनशे गुंतवणूकदारांची सहा कोटींची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मुंबई - न्हावाशेवा येथे नौदल अधिकाऱ्यांना ये-जा करण्यासाठी कार भाड्याने देण्याच्या नावाखाली दोनशे जणांची सहा कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने एका महिलेला अटक केली. 

हरविंदर कौर ऊर्फ विनी नागपाल असे तिचे नाव आहे. तिच्याविरोधात भादंविसह महाराष्ट्र गुंतवणूकदार ठेवीदार हितसंबंध संरक्षण कायद्याच्या (एमपीआयडी)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांच्या नावावर कार खरेदी करून भाड्याद्वारे चांगला मासिक परतावा देण्याचे प्रलोभन दाखविल्याचा आरोप तिच्यासह साथीदारांवर ठेवला आहे. 

हरविंदर ही एसएम मोटर्स कंपनीची व्यवस्थापक होती. या कंपनीसह एटूझेड नावाच्या कंपनीच्या आडून आरोपींनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या दोनही कंपन्या नरेश नवले नावाच्या व्यक्तीच्या असून, त्याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. याप्रकरणी तपास पथकाने आरोपींचे नवी मुंबईतील दोन फ्लॅट व व्यावसायिक गाळा अशा दोन कोटींच्या मालमत्तांची माहिती घेतली आहे. 

परतावा बंद 
हरविंदरने तक्रारदाराला महिन्याला नियमित 15 ते 45 हजार रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाचे प्रलोभन दाखवले होते. तक्रारदाराकडून पाच ते आठ लाखांची रक्कम स्वीकारून आरोपींनी सुरुवातीला दोन-तीन महिने परतावा दिला. गुंतवणूकदारांची संख्या वाढल्यावर त्यांनी पैसे देणे बंद केले.

Web Title: Six crores fraud in mumbai