रुग्णालयातील आगीत सहा जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

मुंबई - अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोरील राज्य कामगार विमा रुग्णालयात सोमवारी (ता. 17) सायंकाळी आग लागली. या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आणि 135 जण जखमी झाले. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

मुंबई - अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोरील राज्य कामगार विमा रुग्णालयात सोमवारी (ता. 17) सायंकाळी आग लागली. या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आणि 135 जण जखमी झाले. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

राज्य कामगार विमा योजनेच्या पाच मजली रुग्णालयात 350 खाटा आहेत. तळमजल्यावर अपघात विभाग, पहिल्या मजल्यावर बाह्य रुग्ण विभाग, दुसऱ्या मजल्यावर स्त्रीरोग विभाग, तिसऱ्या मजल्यावर शस्त्रक्रिया विभाग तर चौथ्या मजल्यावर अतिदक्षता आणि शस्त्रक्रिया विभाग आहे. सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अचानक धूर निघू लागल्यामुळे धावपळ सुरू झाली. जीव वाचवण्यासाठी रुग्ण पळू लागले. दोन रुग्णांनी इमारतीतून उड्या मारल्याचे वृत्त आहे. आगीची माहिती कळताच अग्निशमन दल आणि स्थानिकांनी बचावासाठी धाव घेतली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आणि 135 जण जखमी झाले. जखमींमध्ये अग्निशमन दलातील दोन जवानांचा समावेश आहे.

परिचारिकेने वाचवले ठरली देवदूत
रुग्णालयात काम करणारी परिचारिका स्नेहा जाधव ही अक्षरशः देवदूत ठरली. स्नेहा या तळमजल्यावरील वॉर्ड क्रमांक 10 मध्ये ड्युटीला होत्या. आगीचे वृत्त समजताच त्यांनी वॉर्डात असलेल्या रुग्णांना धुरातून मार्ग काढत खाली आणले. सहा ते सात रुग्णांना त्या खाली घेऊन आल्या. खाली आणल्यावर त्यांना प्रथमोपचार आणि पाणी दिले. त्यानंतर स्नेहा या जखमींच्या मदतीकरिता धावल्या. तेथे रुग्णांना प्रथमोचार करण्याचे त्यांनी काम केले.

अन्‌ तिची प्रसूती झाली
आगीनंतर सर्वत्र पळापळ सुरू झाली. दुसऱ्या मजल्यावर प्रसृतीकरिता आलेल्या एका महिलेला अचानक प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. बचावाकरिता ती आरडाओरडा करता होती. हा प्रकार अग्निशमन दलाच्या निदर्शनास आला. अग्निशमन दलाने तिला शिडीवरून खाली उतरवले. खाली येताच तिची प्रसूती झाली. त्या महिलेला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: Six Death in Hospital Fire