ठाणे : घोलाई नगरमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; सहा घरांचे नुकसान

कळवा घोलाई नगर येथील गगनगिरी चाळीत दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची तर, एक गॅस सिलेंडर लिकेज झाल्याची घटना घडली आहे.
Cylinder Blast
Cylinder BlastSakal
Summary

कळवा घोलाई नगर येथील गगनगिरी चाळीत दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची तर, एक गॅस सिलेंडर लिकेज झाल्याची घटना घडली आहे.

ठाणे - कळवा घोलाई नगर (Gholai Nagar) येथील गगनगिरी चाळीत दोन गॅस सिलेंडरचा स्फोट (Gas Cylinder Blast) झाल्याची तर, एक गॅस सिलेंडर लिकेज झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसून सहा घरांचे नुकसान (Home Loss) झाले असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

कळवा येथील पारधी पाडा, गणेश वेल्फेअर सोसायटी, घोलाई नगर, कळवा (पु.), ठाणे येथे गगनगिरी चाळीमध्ये गुरुवारी संध्याकाळी ४.३५ वाजेच्या सुमारस २-गॅस सिलिंडरचा स्फोट आणि १ गॅस सिलिंडरची गळती होऊन आग लागली होती.

Cylinder Blast
भाईंदर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने रिक्षाचालकाचा मृत्यू

या घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांच्या सोबत कळवा पोलीस, वन विभागाचे कर्मचारी, टोरेंट विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान १-फायर इंजिन, १-रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते. सदर घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, कोणलाही दुखापत नाही. तर, गगनगिरी चाळीतील या सहा झोपडपट्टी खोल्यांचे पूर्ण नुकसान झाले असून राम उजागीर मोरया, रघुनदन मोरया, हरिश्चंद्र कनोज्या, राजेंद्र बुरुड, कालू गुप्ता, राहुल गुप्ता अशी नुकसान झालेल्या घरमलकांची नावे असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com