एसटीच्या मृत कर्मचाऱ्याच्या वारसांना आता सहा लाख

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

मुंबई - कामावर असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसांना कर्मचारी ठेव विमा योजनेनुसार आता एसटी महामंडळाकडून सहा लाख 15 हजार रुपये देण्यात येणार आहेत. याबाबतची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत केली.

एसटीमध्ये सध्या सुमारे एक लाख कर्मचारी आहेत. काम करत असताना कामगाराचा मृत्यू झाल्यास यापूर्वी तीन लाख 65 हजार रुपये दिले जात होते. आता त्यात वाढ करण्यात आली आहे. 24 मे पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने या योजनेला संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या वेळी प्रधान सचिव (परिवहन) मनोज सौनिक, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल, परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम आणि एसटीतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Six lakhs of ST's dead staff