बस अपघात, चालकासह सहाजण जखमी

बस अपघात, चालकासह सहाजण जखमी

पनवेल : बोरिवली येथून करमाळा येथे जाणाऱ्या एसटी बसला पनवेलजवळील भोकरपाडा गावाच्या हद्दीत अपघात झाला. त्यात बसचालकसह सहा प्रवासी जखमी झाले. सर्व जखमींवर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


सोमवारी बोरिवलीकडून करमाळाकडे 40 प्रवासी घेऊन जाणारी एसटी बस (क्र. एम एच 14 बीटी 4689) भोकरपाडा गावाच्या हद्दीत एका वळणावर आली असता बसचालक कुबेर नारायण तळेकर (45) याचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे भरधाव बस रस्त्याच्या पलीकडे जाऊन पलटली.

या अपघातात बस चालक कुबेर तळेकर याच्यासह नितीन लोटके, सचिन चंदने, पापू रोकडे, पुष्पा कांबळे, रंजना पोहोकर यांच्यासह अन्य काही प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक राजपूत यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक सुनील कारोटे व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे एसटी बसचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com