ऑनलाईन लॉटरीचा पर्दाफाश 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

मुंबई - ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मालवणी पोलिसांनी पर्दाफाश केला. शक्कील सय्यद, अभिनव मिर्झा, महेंद्र सोनी, शब्बीर खोकावाला, अब्दुल खालीद सरदार, आनंद साळुंखे अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने सर्वांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

मालवणी परिसरात मसून लॉटरीचे दुकान आहे. या दुकानात जीएसटी चुकवण्यासाठी ग्राहकांना जीएसटीची पावती न देता बोगस पावती देऊन सरकारचा कर बुडवला जात होता. तशी माहिती मालवणी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री लॉटरीच्या दुकानात छापा मारला. या कारवाईत दोन संगणक, प्रिंटर आणि सहा हजार 800 रुपये जप्त करण्यात आले.

Web Title: Six persons arrested in Malwani