केडीएमसीच्या डॉक्‍टरांचे सहा दिवसांत सहा राजीनामे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत रुग्णालयांची समस्या कायम असतानाच गेल्या सहा दिवसांत सहा डॉक्‍टरांनी राजीनामे दिल्याची माहिती गुरुवारी समोर आली. रुग्णालयांत डॉक्‍टरांची संख्या कमी असतानाच आणखी सहा डॉक्‍टरांनी राजीनामे सोपवल्याने कल्याण-डोंबिवलीत आरोग्य व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत असल्याचे चित्र आहे.

गुरुवारी झालेल्या कल्याण-डोंबिवलीच्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आरोग्य सेवेतील विविध समस्यांकडे लक्ष वेधले. महापालिकेच्या विविध रुग्णालयांतील वाहिकेला चालक नसणे, डॉक्‍टर तसेच इतर कर्मचाऱ्यांची वानवा, बंद असलेले प्रसूतिगृह आदी विषयांवर नगरसेविका सुनीता पाटील, नगरसेवक विश्‍वनाथ राणे यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. तसेच महापालिकेत कार्यरत असलेल्या डॉक्‍टरांना कायमस्वरूपी रुजू करण्याचा प्रस्ताव अद्यापही लांबला असून कमी पगारावर डॉक्‍टर काम करत आहेत, हा मुद्दाही नगरसेवकांनी या वेळी मांडला. यावर उत्तर देताना सहा दिवसांत सहा डॉक्‍टरांनी राजीनामे दिले असल्याचा खुलासा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू लवंगारे यांनी केला.

Web Title: Six resignations of KDMC doctors in six days